श्री जगदंबा माता पतसंस्था
सत्यसेवा ग्रामविकास प्रतिष्ठाण
श्री जगदंबा माता दुधसंस्था
श्री जगदंबा माता वाचनालय
   
 
श्री जगदंबा माता सार्वजनिक वाचनालय
 
१) सार्वजनिक वाचनालय चालविणे व त्यात विविध प्रकारची पुस्तके ठेवणे. त्यात वाचनीय साहित्य उपलब्ध करुन देणे.
२) गरीब, आदिवासी, मागासवर्गीय हुशार विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटप करणे.
३) पुस्तक पेढी योजना सुरु करणे.
४) व्याख्यान, चर्चासत्र, परिसंवाद, कलापत्रके व सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे लोक शिक्षणाचे कार्य करणे.
५) नॆसर्गिक आपत्ती मध्ये सापडलेल्या पिडितांना मदत करणे.
६) कृषी वाचनालय, बालसंस्कार केंद्र चालविणे, सुशिक्षित बेरोजगार, संसारी उद्योजक प्रशिक्षण आयोजित करणे.
७) शेतक-यासांठी कृषी तंत्रञानाविषयी चर्चासत्र आयोजित करणे, गुणवत्ता विद्यार्थ्याचा सत्कार करणे.
८) वृत्तपत्र, साप्ताहिके, मासिके, पुस्तके, ग्रंथ इ. पुस्तके उपलब्ध करुन देऊन सोय करणे.
९) ग्रंथ, वृत्तपत्रे, नियतकालिके, चित्रे मुर्ती शस्त्रे, शिलालेख, हस्तलिखित पुराणवस्तु, तदसदृश्य अन्य वस्तुंचा संग्रह करणे.
१०) आभ्यासिका चालविणे, ग्रंथालय सप्ताह आयोजित करणे. ग्रंथालये व साहित्य क्षेत्रातील संमेलने भरविणे.
११) ऑडिआ, चलचित्रे, बोलपटे, दुरदर्शन, व्ही.सी.डी / डि.व्ही.डी. इ. शास्त्रीय साधने अथवा उपकरणे यांच्या सहाय्याने लोकशिक्षण देणे.
१२) दुर्मिळ ग्रंथ, जुने ग्रंथ हस्तेलिखिते चित्रे इ. च्या मायक्रोफिल्मस काढणे व वाचनालयात उपलब्ध करुन देणे.
१३) जनतेत वाचनाची अभिरुची वाढविणे.