Photo Photo Photo Photo Photo Photo Photo Photo Photo
 
     
  बालवाडी
  कृषि समिती
  स्वयं रोजगार
  आरोग्य समिती
  ग्रामसुधार समिती
  आदिवासी समिती
     
 
   
  प्रतिष्ठान स्थापन करण्याचा उद्देश :-
   
 

सिन्नर शहरच्या पुर्वेस मुंबई-घोटी-सिन्नर- शिर्डी या महामार्गावर सिन्नर शहरापासून ३ कि.मी अंतरावर देव नदी, शिव नदी व सरस्वती नदी या तीन नद्यांच्या पवित्र त्रिवेणी संगमावर जेमतेम चार हजार लोकवस्ती असलेले कुंदेवाडी हे एक छोटेसे खेडेगांव आहे. या पवित्र त्रिवेणी संगमावर कुंदेवाडी गांव संपुर्ण तालुक्याला चांगले परीचित आहे. गावातील लोक हे प्रामुख्याने विडी मजुरी, शेती व शेतमजुरी तसेच बरेचसे लोक गांवा शेजारीच असलेल्या सहकारी ऒद्योगिक वसाहतीत नोकरी करतात, त्यामुळे विडी, शेती व सहकारी ऒद्योगिक वसाहतीत नोकरी ही अर्थकारणाची मुख्य तीन साधने कुंदेवाडी गावासाठी उपलब्ध आहेत. त्रिवेणी संगमा प्रमाणेच त्रिवेणी समाजाचे लोक या गावात राहतात. हे समिकरण गाव ज्या वेळेस वसले गेले त्या वेळेपासून आहे. मात्र खेडेगांव म्हटलं की , काम कमी टवाळकी जास्त हा ग्रामिण भागातील खेड्यांचा मुलभुत गुणधर्म आहे. हे समिकरण पुर्णपणे बदलून टाकण्यासाठी तसेच गावाचा शॆक्षणिक, क्रिडा, सांस्कृतिक, आरोग्य, स्वयंरोजगार निर्मीती अदिवासी विकास व महिला बचत गटांची स्थापना करुन गावातील प्रत्येक ग्रामस्थाची प्रगती करुन प्रत्येक ग्रामस्थांस स्वत:च्या पायावर भक्कम पणे उभे करण्याच्या कामात भाग घेऊन गावाचा विकास घडवुन आणण्यासाठी हक्काचे असे व्यासपिठ असणे गरजेचे वाटु लागल्याने प्रतिष्ठाणची स्थापना करण्याची कल्पना सतत पुढे येऊ लागली, व त्या कल्पनेतुनच सत्य सेवा विकास मंडळाचा उदय झाला.

गावातील ग्रामस्थांना ही विकास कामे करण्यासाठी उत्तेजन देऊन त्यात त्यांना सहभागी करुन त्यांचा विकास करणे शासकीय कार्यक्रम, शासनाच्या विविध योजना गावात उत्तम रितीने राबविण्यासाठी वातावरण निर्मिती करणे व योजना राबवुन घेणे. हा मंडळाचा मुळ उद्देश गावातील सुशिक्षित तरुण तसेच शेतकरी वर्ग आणि वेगवेगळ्या समाजाचे तरुण एकत्र आणुन त्यांच्या विचारांची देवाण घेवाण होऊन त्यातुन निघणारा सारांश हा गावच्या विकासासाठी उपयोग करुन घेणे कारण अनेकांचे विचार एकत्र आले तरच चांगल्या प्रकारचे ध्येय साध्य करणे फारसे अवघड नसते. त्यासाठी काही तरुण विचारवंतानी विचार केला आणि गावात टिंगल टवाळी करणारे लोक दिल्ली पासून तर गल्ली पर्यंत बाता तंबाखुच्या एक विशा खाऊन थुंकेपर्यंत जेवढा वेळ लागतो तेवढ्याच वेळातच ते दिल्लीवरुन जाऊन आलेले असतात. हे कुठेतरी थांबले पाहीजे म्हणुन काही व्यक्तींना गावात असे विकासाचे काम करणारे मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेत दिनांक २२ डिसेंबर १९९४ रोजी प्रत्यक्षात मंडळाची स्थापना करुन गावात विविध विकास कामे सुरु करण्यात आली सर्वजण या कामासाठी एकत्र येऊन काम करु लागले. कुंदेवाडी हे गांव एक आदर्श गांव बनविण्याचा सत्य सेवा विकास मंडळाच्या कार्तकर्त्यांनी पक्का निर्धार केलेला असून त्या दृष्टीने कार्यकर्ते काम करत आहे.

मंडळाचे मुख्य उद्देशाप्रमाणे मंडळाने कुंदेवाडी गावात ग्रामस्थांसाठी शॆक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, आरोग्य, क्रिडा, स्वयंरोजगार निर्मिती, महिलाबचत गटाव्दारे महिलांचे सबलीकरण, रोजगार उपलब्ध करुन देण्याचे क्षेत्रात तसेच आदिवासी विकासाचे चांगले काम उभे करुन निर्माण केले आहे. ह्या कार्याची नोंद घेऊन गांवच्या ह्या मंडळाला सन १९९५-९६ सालाचा जिल्हा युवा मंडळ पुरस्कार व सन १९९६-९७ सालाचा राज्य युवा मंडळ युवा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मंडळाचे मुख्य उद्देशाप्रमाणे दॆनदिंन काम करत असतांनाच गावातील सुशिक्षित तरुण तसेच शेतकरी वर्गाच्या आर्थिक गरजा पुर्ण करण्यासाठी सहकारी पतसंस्था स्थापन करण्याची कल्पना पुढे आली व या आर्थिक गरजा पुर्ण करण्यासाठीच मंडळाने सन १९९७ मध्ये कुंदेवाडी येथे श्री जगदंबा माता ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. या पतसंस्थेची स्थापना करुन आज दहा वर्षाचा कालावधी पुर्ण होत आहे. या दहा वर्षाच्या कालावधीत या छोट्याशा वटवृक्षाच्या दोन शाखा मुसळगांव व सहकारी ऒद्योगिक वसाहत या दोन ठिकाणी स्थापन करुन आज या शाखा यशस्वीपणे कार्यरत आहे. आज संस्थेची कुंदेवाडी येथे सुसज्ज व आधुनिक पध्दतीची स्वमालकीची भव्य इमारत असुन तीनही ठिकाणी स्वमालकीचे जागेत असलेल्या शाखांचे कामकाज पुर्णपणे संगणकीकृत आहे. ही पतसंस्था कुंदेवाडी, मुसळगांव तसेच परिसरातील सुशिक्षित तरुण, शेतकरी कामगार व व्यवसायिकांची मुख्य आर्थिक वाहीनी संबोधली जाते. आता काळाच्या ओघात सिन्नर तालुक्यातील एक नावाजलेली चांगली पतसंस्था म्हणुन नावारुपास आलेली आहे. या पतसंस्थेची चॊथी शाखा लवकरच सिन्नर येथे सुरु करण्याचा संस्थेच्या व मंडळांच्या कार्यकर्त्यांचा मानस आहे.

सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या पुर्णपणे मेटाकुटीला आलेला आहे. ही बाब कुंदेवाडी गावात सत्यसेवा विकास मंडळ व श्री जगदंबा माता पतसंस्थेत शेतकरी बांधवांबरोबर काम करतांना प्रकर्षाने लक्षात आली ही बाब ज्या-ज्या वेळी उपस्थित झाली त्या-त्या वेळी कुंदेवाडी गावातील शेतकरी बांधवांना प्रामुख्याने स्वावलंबी करुन त्यांची कायमस्वरुपी आर्थिक उन्नती होण्याकरीता काहीतरी ठोस अशी उपाययोजना केलीच पाहिजे ह्या दृष्टीने आम्ही विचार करत असतांना दॆनंदिन शेती व्यवसायाशी अतिशय निगडीत असलेल्या शिवाय शेती व्यवसायासाठी एक पुरक जोडधंदा म्हणुन इतर शेजारील तालुक्यात १००% यशस्वी असलेला व्यवसाय म्हणुन दुग्ध व्यवसाय आमच्या समोर आला.

सदर व्यवसाय गावातील शेतक-यासाठी निश्चित दोन पॆसे मिळवुन देणारा व शेती व्यवसायासाठी चांगला जोडधंदा होऊ शकेल याची आम्हाला खात्री पटल्याने आम्ही दुध व्यवसाय गांवात सुरु करण्याच्या कामास लागलो. व गावात दुध उत्पादक संस्था स्थापनेचा निर्णय ग्रामस्थ व शेतक-यांच्या सम्मतीने घेतला. व श्री जगदंबा माता सहकारी दुध उत्पादक संस्थेची दिनांक-०६/०१/२००७ रोजी स्थापना करुन कुंदेवाडी गावांत प्रत्यक्षात दुध डेअरीच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली. मंडळ ज्या मुळ उद्देशाने स्थापन झाले तो उद्देश जास्तीत जास्त चांगल्या व सोप्या पद्धतीने अधिका-आधिक साध्य होण्याच्या उद्देशाने व गावातील प्रत्येक कार्यकर्त्यास मंडळाचे काम करता यावे व प्रत्येकाच्या कलागुणांचा गावच्या विकासासाठी आधिका-अधिक उपयोग चांगल्या पध्दतीने करता यावा व आपले विकास कामातील कॊशल्य दाखवता यावे यासाठी सत्य सेवा विकास मंडळाने वेगवेगळ्या ११ उपसमित्यांची स्थापना करुन त्या-त्या क्षेत्रात काम करण्याची आवड असणा-या गावातील तरुण कार्यकर्त्यांची या उपसमित्यांवर स्वतंत्ररित्या नेमणुक करुन त्यांना दॆनिक/मासिक/वार्षिक कामकाजाची लेखी रुपरेषा ठरवुन दिलेली असल्याने प्रत्येक उपसमितीचे कामकाज प्रत्येक उपसमितीत काम करणारे गावातील तरुण कार्यकर्ते अतिशय क्रियाशिल पध्दतीने यशस्वी रित्या करत असून ते वेगवेगळे कामकाज दरमहा कुंदेवाडी गावातील ग्रामस्थांना पाहावयास मिळत आहे. मंडळाने स्थापन केलेल्या त्या ९ उपसमित्यां पुढील प्रमाणे-

१) शिक्षण समिती
२) कृषी समिती
३) स्वयं रोजगार निर्माण समिती
४) आरोग्य समिती
५) ग्रामसुधार समिती
६) क्रिडा समिती
७) गणेशोत्सव समिती
८) सांस्कृतिक विकास समिती
९) उत्सव समिती
१०) आदिवासी विकास व उत्कर्ष समिती

वरील कार्यरत असलेल्या विविध १० उपसमित्या स्थापनेचा मंडळाचा उद्देश व त्या उपसमित्यांवी स्वतंत्र रित्या निश्चित केलेल्या कामकाजाची रुपरेषा पुढील प्रमाणे:-

१) शिक्षण समितीचा उद्देश व हाती घेतलेली कामे :-

* समितीचा उद्देश - गावातील भावी पिढीचा शैक्षाणिक विकास करणे व एक सुसंस्कृत पीढी घडवणे.
* समितीने हाती घेतलेले कामे :-

१. राज्य सरकार व केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाकडुन वेळोवेळी जाहीर होणा-या योजनांची माहीती बैठकीद्वरे ग्रामस्थांना देणे, योजनांचा जास्तीत जास्त फ़ायदा ग्रामस्थांना होण्यासाठी प्रयत्न करणे.

२. आदिवासी समाजातील लहान मुलांना अंगणवाडी,प्राथमिक शाळेत जाण्यासाठी सतत प्रोत्साहीत करणे.

३. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त प्रवेश संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.

४. वाचणालय/बालवाचणालयाची निर्मिती करून ते यशस्वी चालविणे.

५. गावातील हुशार विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धा,वादविवाद स्पर्धा घेणे व अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे.

६. इ.१०,१२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढे काय? या विषयी तज्ञ व्यक्तिंकडुन मार्गदर्शन करणे.

७. राष्ट्र पुरूषांचे विचार विद्यार्थांपर्यंत पोचवण्यासाठी अनुभवी व्यक्तिंचे वेळोवेळी व्याख्यान आयोजित करणे.

८. मंडळाने सुरू केलेली श्री जगदंबा बालनिकेतन या नावाने बालवाडीची सर्व जबाबदरी शिक्षण कमिटीची असुन त्याप्रमाणे मंडळाने गावात बालवाडी सुरू केली अहे.

  अधिक माहीती पुढे