श्री जगदंबा माता पतसंस्था
सत्यसेवा ग्रामविकास प्रतिष्ठाण
श्री जगदंबा माता दुधसंस्था
श्री जगदंबा माता वाचनालय
   
   
  प्रस्तावना , व संस्था स्थापने मागील पार्श्वभुमी
   
  सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या पुर्णपणे मेटाकुटीला आलेला आहे. ही बाब शेतकरी बांधवा बरोबर काम करताना प्रकर्षाने लक्षात आली. ही बाब ज्या ज्यावेळी उपस्थित झाली त्या त्या वेळी कुंदेवाडी गावातील शेतकरी बांधवांना स्वावलंबी त्यांची कायमस्वरुअपी आर्थिक उन्नती होण्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना केली पाहिजे ह्या दृष्टीने आम्ही विचार करत असतांना दॆनंदिन शेती व्यवसायाशी अतिशय निगडीत असलेला शिवाय शेती व्यवसायासाठी एक पुरक जोडधंदा म्हणून इतर शेजारील तालुक्यात १०० टक्के यशस्वी असलेला व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय आमच्या समोर आला व सदर व्यवसाय आपल्या गावातील शेतक-यांसाठी निश्चित चांगला जोडधंदा होऊ शकेल याची आम्हाला खात्री पटल्याने आम्ही त्या कामास लागलो व गावात दुध उत्पादक संस्था स्थापनेचा निर्णय ग्रामस्थ व शेतक-यांच्या संमतीने घेतला. शासकीय नियमांची पुर्तता करुन श्री, जगदंबा माता सहकारी दुध उत्पादक संस्था मर्या., कुंदेवाडी ह्या दुध संस्थेची स्थापना झाली. दुध संकलनाचे प्रत्यक्ष कामकाज दि.१/०१/२००७ जोजी सुरु केले. ह्या दिवशी संस्थेम मिळालेले दुध फक्त २५ लिटर आज सव्वा वर्षाच्या कालावधीअखेर दॆनंदीन नियमित जमा होणारे दुध आहे १७०० लिटर. ह्या दुग्ध व्यवसायामुळे १५० शेतक-यांना निश्चित उत्पन्नाची हमी मिळालेली आहे. दुध संस्थेची एक शाखा दि.१८/०३/२००८ रोजी मुसळगांव येथे सुरुवात केलेली असुन तेथील शेतक-यांनी दुध संकलना मध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे. संस्थेचा माहितीपट खालील प्रमाणे.
   
 
संस्थेची माहिती
     
अ.नं तपशिल माहिती
     
१. संस्थेचे संपुर्ण नांव श्री जगदंबा माता सहकारी दुध उत्पादक संस्था मर्या., कुंदेवाडी ता.सिन्नर (नाशिक)
२. नोंदणी क्रमांक नोंदणी दिनांक एन.एस.के/(एस.एन.आर) ए जी आर (ओ)/१०८५ (डी) २००७ दि.६/१/२००७
३. वसुल भागभांडवल ५८००
४. संस्थेच्या प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात दि.१ जानेवारी २००७
५. संस्थेच्या शाखा १) मुख्य कार्यालय कुंदेवाडी दि.१/१/२००७ पासून
६.   २) मुसळगांव दुध संकलन शाखा सुरुवात दि.१८/३/२००८ पासून
७. एकुण दुध खातेदार ३०५
८. दॆनंदिन दुध संकलन १७०० लिटर
९. दर महिन्यास जमा होणारे दुध (लिटरमध्ये) ५१००० लिटर
१०. सध्याचा चालु दराने मिळणारा भाव प्रति लिटर भाव रु.१२.५० सरासरी एकुण मासिक मिळणारे दुध बील रु.५,२५,०००/-
११. गावातील गायींची एकुण संख्या ६००
   
 
श्री जगदंबा माता पतसंस्थेद्वारे वाटप केलेले कर्जदारांची संख्या व कर्जदार कुंदेवाडी कार्यालय मुसळगांव शाखा
  कर्जदार संख्या वाटप कर्ज कर्जदार संख्या वाटप कर्ज
एकुण कर्जदार संख्या १३७ ५१ १०,७५,०००/- ८६ २०,०२,०००/-
वाटप कर्जांची रक्कम ३०,७७,०००/- - - - -
   
  संस्थेची वॆशिष्ट्ये
   
  १) दि.१/१/२००७ रोजी दॆनिक २५ लिटर दुध संकलनावर केलेली सुरुवात आज दॆनिक १७०० लिटर पर्यंत पोहचलेले आहे.
२) सिन्नर तालुक्यामधील सिन्नर तालुका दॊध संघास जमा होणा-या एकुण दुध संकलनामध्ये श्री जगदंबा माता दुध उत्पादक संस्थेचा दुसरा क्रमांक लागतो.
३) दुध खातेदारांचे दुध पेमेंट वाटप श्री जगदंबा माता ग्रामिण बिगर शेती सह.पतसंस्थेमधुन केले जाते.
४) मुसळगांव येथे दि.१८/३/२००८ पासुन दुध संस्थेची स्वतंत्र एक शाखा सुरु केलेला आहे.
५) दुध संकलन संगणकाद्वारे केले जात आहे. दुध खातेदारास दुध जमा करतांना दुधाला मिळालेल्या भावाची पोचपावती दिली जाते.
६) दर दहा दिवसास दुध सभासदांना एकुण दुह बील सरासरी २,२५,०००/- वाटप केले जात आहे.
७) दि. १५ नोव्हेंबर ०८ ते १५ डिसेंबर ०८ या कालावधीत संस्थेने दुध संकलन वाढ अभियानांतर्गत दुग्ध गाय दाखवा, तत्काळ कर्ज मिळवा हे अभियान राबविलेले आहे.