श्री जगदंबा माता पतसंस्था
सत्यसेवा ग्रामविकास प्रतिष्ठाण
श्री जगदंबा माता दुधसंस्था
श्री जगदंबा माता वाचनालय
   
 
पतसंस्थेची वर्षानुसार आर्थिक स्थिती तक्ता बघण्यासाठी क्लिक करा
 
प्रस्तावना :-


कुंदेवाडी गावाची ग्रामदेवता
श्री जगदंबा माता
» कुंदेवाडी हे सिन्नर तालुक्यातील छोटेसे गाव ! देवनदी, शिवनदी आणि सरस्वती या तीन नद्यांच्या त्रिवेणी सगमावर असलेले टुमदार गाव . जवळच मुसळगांव शिवारात सह्कारी ऒद्योगिक वसाहत असल्याने गावांत मोठ्या प्रमाणावर बाहेरील लोकांची लोकसंख्या वाढु लागली. ऒद्योगिक वसाहतीमुळे आर्थिक संपदाही गावांत आली. पॆसा आल्यावर दुर्गूणही लवकरच चिकटतात हा निसर्गाचा नियम असल्याने आर्थिक संपदेबरोबरच चांगले विचार, चांगले आचार येणे हे अतिशय महत्त्वाचे , पण तेवढ्याच अवघड कामा कारण संपदेला सदविचाराची जोड मिळाली तर त्यातुन आदर्श माणुस घडतो. हे लक्षात घेऊन सन १९९४ मध्ये गावातील काही तरुणांनी एकत्र येऊन आदर्श माणुस व आदर्श गाव घडविण्याचे उद्देशाने , विचारातुन रिकाम्या वेळी वाया जाणारी युवा शक्ती आणि प्राप्त परिस्थितीत नाऊमेद होऊन प्रपंचात गुरफटलेली मने याची सांगड घालून ह्या आव्हानाला संस्थेने सामोरे जाण्याचा निर्धार केला . निर्धाराला कृतीची जोड दिली आणि त्यातून निर्माण झाली "सत्य सेवा विकास मंडळ " या नावाची गावासाठी सेवाभावी कामकरणारी संस्था .

संस्थेचे दॆनंदिन कामकाज एप्रिल १९९४ पासुन सुरु झाले . संस्थेस अवघ्या दोन वर्षात सन १९९४-९५ सालात ’जिल्हा युवा ’ पुरस्कार मिळाला त्यामुळे तरुणांचा उत्साह वाढला . संस्थेचे काम अधिक वेगाने वाढले नंतरच्या वर्षी सन १९९५-९६ सालात ’राज्य युवा’ पुरस्कार मिळाला . गावांत मंडळाने केलेल्या सेवाभावी कामामुळे संस्थेस पुरस्कार मिळत होते. परंतु संस्थेस नुसते पुरस्कार मिळुन चालणार नाही. तर गावातील प्रत्येक ग्रामस्थांचा आर्थिक विकास झाल्याशिवाय गावाचां परीपुर्ण विकास शक्य नाही . ह्यासाठी गावांतील प्रत्येक कुटुंबाची आर्थिक स्थिती भक्कम होऊन , प्रत्येकाने नोकरी करण्यापेक्षा स्वत:चा व्यवसाय केल्याशिवाय, तसेच शेतक-यांनी पारंपारीक शेती करण्याचे सोडुन व्यापारी शेती केल्याशिवाय तसेच मिळणा-या उत्पन्नातुन आर्थिक बचत केल्याशिवाय त्याचा , त्याच्या कुटुंबाचा परिणामी कुंदेवाडी गावाचा विकास होणार नाही . हा मुद्दा सेवभावी संस्थेत काम करतांना मंडळाच्या कार्यशिल सभासदंच्या लक्षात आला. हा आर्थिक प्रश्न सोडवायचा असेल तर त्यासाठी आपल्याकडे हक्काची आर्थिक नाडी असल्याशिवाय ग्रामस्थांचा आर्थिक विकास करण्यासाठी आपण हातभार लावु शकणार नाही. हा निश्चय करुन सर्व तरुणांनी गावांत पतसंस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. हा - हा म्हणता अवघ्या तीन दिवसांत पतसंस्था स्थापन करण्यासाठी कराव्या लागणा-या कायदेशिर बाबींची पुर्तता केली व कुंदेवाडी गावाची असलेली ग्रामदेवता श्री जगदंबा माता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था या नावाने सहकारी पतसंस्था नोंदणी करण्यात आली. कुंदेवाडी गावात प्रत्यक्ष पतसंस्थेचे कामकाज दि. १/११/१९९७ रोजी सुरु केले.