श्री जगदंबा माता पतसंस्था
सत्यसेवा ग्रामविकास प्रतिष्ठाण
श्री जगदंबा माता दुधसंस्था
श्री जगदंबा माता वाचनालय
   
» संस्थेने आजपर्यंत कोणत्याही वित्तिय संस्थचे कर्ज घेतलेले नाही. स्वता:च्या भांडवलावर संस्थेचे व्यवहार चालु आहे.

"कुबेर" इमारत - संस्थेचे मुख्य कार्यालय
» पतसंस्थेचे कुंदेवाडी येथील मुख्य कार्यालय , मुसळगांव येथील उपशाखा, सहकारी औद्योगिक वसाहतमधील सिन्नर ओद्यो.वसा. शाखा हे तिन्ही कार्यालयाच्या इमारती संस्थेच्या स्वमालकीच्या इमारती असुन तिन्ही कर्यालयाची अंतर्गत सजावट केलेले सुंदर पध्दतीचे व संगणकीय शाखा आहे.
» उपशाखा मुसळगांव

सुरुवात दिनांक : २२/१०/१९९९


» औद्योगिक सहकारी वसाहत शाखा.

सुरुवात दिनांक : ०९/११/२००६
» संस्थेच्या सहकारी औद्योगिक वसाहत शाखेत वीज भरणा केंद्र सुरु करण्यात आले असुन या ठिकाणी कुंदेवाडी, मुसळगाव, औद्योगिक वसाहत, शंकरनगर, विनर टाउनशिप, गुरेवाडी, सुळेवाडी, बा. पिंप्री, पाट पिंप्री, विजयनगर येथील सर्व वीज ग्राहकांना आपली वीज बिले पतसंस्थेत भरता येईल. या सेवेचा शुभारंभ शुक्रवार दि. ८ मे २००९ रोजी समारंभपुर्वक करण्यात आला.
» मुदतीत कर्ज भरणा-या कर्जदारांचा वार्षिक सभेत शाल गुच्छ देउन सत्कार करण्याची प्रथा तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात या पतसंस्थेने केली असुन प्रती वर्षी अशा कर्जदारांना संस्थेकडुन गौरव केला जातो. अशाच प्रकारे आर्दश कर्जदाराचा सत्कार करतांना

» इयत्ता १० वी व १२ वी मध्ये उत्तीर्ण होणा-या गुणवंत विद्यार्थांचा सत्कार वार्षिक सर्वसाधारण सभेत केला जातो.

पतसंस्थेच्या वतीने प्रती वर्षी इ. १० वी व १२ वी मध्ये उर्त्तीण झालेल्या प्रथम तीन विद्यार्थ्याचा सत्कार केला जातो. अशाच प्रकारे उर्त्तीण विद्यार्थ्याचा सत्कार करतांना
» संस्थेकडुन कर्ज वितरण करताना प्रत्येक कर्जदाराचा वैयक्तिक अपघात विमा काढला जातो.

वॆयक्तिक अपघात विमा योजने अंतर्गत कॆ. सुकदेव भिमाजी पाटोळे यांचे वारसदारांना संस्थेने रु. एक लाख रुपयाची नुकसान भरपाई मिळवुन दिले तो चेक वारसांना वितरीत करतांना छायाचित्रात दिसत आहे.
»संस्थेच्या धर्मादाय निधी खात्यातुन कुंदेवाडी गावाचे ग्रामदॆवत श्री जगदंबा माता मंदिरास रु.१,५१,०००/- रक्कमेची देणगी दिली त्या देणगीतुन उभी राहिलेली कुंदेवाडी गावाची शान असलेली मंदिराची वास्तु.
» श्री जगदंबा माता दुध उत्पादक सहकारी संस्थेच्या दुध उत्पादक सभासदांना दुग्ध व्यवसायासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी तसेच शेतीबरोबरच जोडधंदा व्यवसाय वाढीसाठी पतसंस्थेने मार्च २००९ अखेर १३७ शेतकरी सभासदांना कर्ज वितरीत करुन गांवात मोठा दुध व्यवसायाची उभारणी केली असुन वितरीत केलेली एकुण कर्ज रक्कम २०,०२,०००/- इतकी आहे
»कुंदेवाडी गावातील सर्व महीलांना स्व्यंसहाय्यता बचतगट तयार करण्यासाठी प्रोत्साहीत करुन ३२ बचतगटाची स्थापना केलेली आहे.
»  पतसंस्था व गावातील सत्यसेवा ग्राम विकास प्रतिष्ठान यांचे माध्यमातुनस्वयंरोजगार शिबीर दि. १/७/२००६ ते दि. १०/७/२००६ या कालावधित संपन्न झाले. त्याचप्रमाणे आधुनिक कृषी चर्चासत्राचे आयोजन करुन शेतकरी बांधवांना शेती विषयकमाहीती देण्याचे कामकाज संस्थेने सुरु केलेले आहे.

» कुंदेवाडी गावातील सर्व महीलांना स्व्यंसहाय्यता बचतगट तयार करण्यासाठी प्रोत्साहीत करुन ३२ बचतगटाची स्थापना केलेली आहे.

» दर वर्षी दिपावलीच्या बलिप्रतिपदेच्या शुभ मुहुर्तावर संस्थेचा वर्धापनदिन समारंभ साजरा केला जातो.

» सन २००८ मध्ये संस्थेस ११ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल संस्थेच्या सभासदांना चांदीची मुद्रा सप्रेम भेट देण्यात आली.