व्याजदराचा तक्ता
संस्थेची टिपणी
पतसंस्थेची कामे
आर्थिकविकासाचा तक्ता
कर्जाचे प्रकार
   
   
 
पतसंस्थेची सामाजिक बांधिलकीतुन करत असलेली कामे-
 
 
 
१) संस्थेने आजपर्यंत कोणत्याही वित्तीय संस्थेचे व्यवहार चालु आहे.
 
२) पतसंस्थेने सिन्नर ऒद्योगिक सहकारी वसाहत शाखेसाठी विद्युत बिल स्विकृत केंद्र सुरु करणेसाठी वीज वितरण कंपनीने मान्यता दिलेली असुन येत्या मार्च २००९ पासुन विद्युत बील भरणा केंद्रास प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात केली जाणार आहे.
 
३) श्री जगदंबा माता दुध उत्पादक सहकारी संस्थेच्या दुध उत्पादक सभासदांना दुग्ध व्यवसायासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी तसेच शेती बरोबर जोडधंदा व्यवसाय वाढीसाठी पतसंस्थेने १३७ सभासदांना कर्ज वितरित केलेले आहे. एकुण कर्ज वाटप रक्कम रु.२०,०२,०००/-
 
४) पतसंस्थेचे मुख्य कार्यालय कुंदेवाडी, उपशाखा मुसळगांव, व सिन्नर ऒद्यो. सह. वसाहत शाखा हे तिन्ही कार्यालयाच्या इमारती संस्थेच्या स्वमालकीच्या आहेत.
 
५) कुंदेवाडी गावातील सर्व महिलांना स्वयंसहाय्यता बचतगट तयार करण्यासाठी प्रोत्साहित करुन ३२ बचतगटाची स्थापना केलेली आहे.
 
६) पतसंस्था व गावातील सत्य सेवा ग्राम विकास प्रतिष्ठान यांचे माध्यमातुन स्वयंरोजगार शिबीर दि.०१/७/२००६ ते १०/७/२००६ या कालावधीत संपन्न झालेले आहे. त्याचप्रमाणे आधुनिक कॄषी चर्चासत्राचे आयोजन करुन शेतकरी बांधवांना शेती विषयक माहिती देण्याचे कामकाज संस्थेने सुरु केलेले आहे.
 
७) मुदतीत कर्ज भरणा-या कर्जदारांचा वार्षिक सभेत शाल गुच्छ देवुन सत्कार करण्याची प्रथा तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात प्रथमच सुरु केली आहे.
 
८) इयत्ता १० वी व १२ वी मध्ये उत्तीर्ण होणा-या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार वार्षिक सर्वसाधारण सभेत केला जातो.
 
९) दर वर्षी दिपावलीच्या बलिप्रतिपदेचे दिवशी संस्थेचा वर्धापनदिन समारंभ साजरा केला जातो.
 
१०) शासनाने वेळोवेळी आव्हान केल्यानुसार संस्था नॆसर्गिक आपत्तीसाठी मदतनिधी देत असते.
 
११) वॆयक्तीक अपघात विमा योजने अंतर्गत कॆ.सुकदेव भिमाजी पाटोळे यांचे वारसदारांना संस्थेने रु. एक लाख रुपयाची नुकसान भरपा मिळवुन दिलेली आहे.
 
१२) संस्थेने धर्मदाय निधी खात्यातुन कुंदेवाडीचे ग्रामदॆवंत श्री जगदंबा माता मंदिरास रु.१,५१,०००/- रक्कमेची देणगी दिलेली आहे.
 
१३) संस्थेच्या भागधारक सभासदांना संस्थेस ११ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल चांदीची मुद्रा सप्रेम भेट देण्यात आली