Photo Photo Photo Photo Photo Photo Photo Photo Photo
 
     
  बालवाडी
  कृषि समिती
  स्वयं रोजगार
  आरोग्य समिती
  ग्रामसुधार समिती
  आदिवासी समिती
     
 
 
आदिवासी विकास व उत्कर्ष समितीने हाती घेतलेली कामे :-

सत्य सेवा ग्रामविकास प्रतिष्ठान ही (एन.जी.ओ) आदर्श ग्राम संकल्पनेचा ध्यास घेवून सामाजिक कार्यात उतरलेली आहे. परंतु आदर्श ग्रामसंकल्पना साकार करायची असेल तर गावातील प्रत्येक नागरिकाचे राहणीमान स्तर उंचावला पाहिजे, प्रत्येक घटकाचा विकास झाला पाहिजे ह्या बाबीचा विचार करुन प्रतिष्ठानने प्रथम पुर्ण गावाचे सुक्ष्म निरिक्षण (सर्वे) करुन प्राथमिक सुविधापासून देखील वंचीत असलेल्या गावातील आदिवासी बांधवाकडे लक्ष केंद्रीत केले. त्याचे राहणीमान उंचावण्यासाठी प्रतिष्ठानने गावातील आदिवासींचा विकास व त्यांचा उत्कर्ष हा ठोस कार्यक्रम हाती घेतला त्याप्रमाणे गावातील आदिवासी कुटुंबाचा सर्व्हे करुन एकुण ७६ कुटुंबातील ४५४ आदिवासींचा त्यांचे शिक्षण, वय,व्यवसाय व घराची एकदंर परिस्थिती यांचे पुर्ण सर्वेक्षण करुन त्याची एकत्रीत माहिती गोळा केली असता त्यातून एक बाब प्रकर्शाने लक्षात आली की, गावातील सर्व आदिवासी बांधव हे आज प्रचलित शासकीय योजनांपासून १००% दुर्लक्षित आहे. ह्या योजनांच्या माहिती बद्दल त्यांना गंध देखिल नाही ह्या आदिवासींचा विकास करावयाचा असेल तर त्यांना शासनाच्या विविध योजना त्यांच्या घरापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. त्याकामी प्रथम या संस्थेने असलेल्या सर्व योजनांचा अभ्यास केला असता असे लक्षात आले की, महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाकडे महाराष्ट्रातील सर्व आदिवासी बांधवांसाठी एकुण ३५ प्रकारच्या विविध योजना कार्यरत आहे. त्या सर्व योजनांचा फायदा द्यावयाचा असल्यास प्रत्येक आदिवासी कुटुंबाकडे जातीचा दाखला व उत्पन्नाचा दाखला असल्याशिवाय ह्या एकाही योजनेचा फायदा त्यांना मिळणार नाही. म्हणून आम्ही प्रत्येक आदिवासी व्यक्तीकडे जातिचा दाखला व उत्पन्नाच्या दाखल्याची चॊकशी केली असला त्यांच्याकडे हे दाखले नाही, ते कोठे मिळतात याची माहिती नाही अथवा ते काढण्यासाठी काय कागद पत्र लागतात त्या कागदपत्राची एकाही आदिवासी बांधवाकडे उपलब्धता नसल्याने आमच्या संस्थेने प्रथम कुंदेवाडी गावातील सर्व १००% कुटुंबांना जातीचा दाखला व उत्पन्नाचा दाखला मिळवुन देण्याचा ठोस कार्यक्रम हाती घेण्याचे निश्चित केले व प्रत्यक्ष कामाला लागलो.

आदिवासी कुटुंबास जात प्रमाणपत्र मिळवुन देण्यासाठी प्रतिष्ठाणचे प्रयत्न :-

     

कुंदेवाडी गावामधील सर्व आदिवासी बांधवाचा प्रतिष्ठानने सर्व्हे केला असता प्रथम फक्त एकाच कुटुंबातील ८ व्यक्तीकडे जात प्रमाणपत्र असल्याचे आढळुन आले. बाकी ७४ कुटुंब व त्या कुटुंबातील ४४६ सदस्यांकडे जात प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याने प्रतिष्ठानने कुंदेवाडी गावातील सर्व आदिवासी बांधवाना जात प्रमाणपत्र मिळवुन देण्यासाठी व जात प्रमाणपत्राचे असलेले महत्व पटवून देण्यासाठी दि.२१/१२/२००७ रोजी कुंदेवाडी गावात जात प्रमाणपत्र माहिती मेळावा घेण्यात आला. शासकीय नियमातील कागदपत्रांची सर्व पुर्तता संस्थेने स्वत: करुन कोणाही आदिवासीस तहसिलदार कचेरीत न पाठवता सर्व काम संस्थेने पुर्ण केले व दाखले मिळविले ते दाखले कुंदेवाडी येथे संस्थेने दि.२६/०२/२००९ रोजी समारंभ पुर्वक वाटप केले. ह्याकामी लाभार्थींना स्वता:स कोठेही जावे लागले नाही अथवा ह्याकामी एक रुपया देखील खर्च करावा लागला नाही. ही गोष्ट संस्था ह्याठिकाणी अभिमान पुर्वक नमुद करत आहे. सर्वसाधारणपणे तालुक्यातील कुठल्याही व्यक्तीस जात प्रमाणपत्र घेण्यासाठी, त्याची कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी तसेच ते मिळविण्यासाठी शासकीय कार्यालयात चकरा मारणे इत्यादी सर्व कामासाठी साधारणपणे दोन ते तीन हजार रुपये इतका खर्च येतो शिवाय किती तरी दिवसाचा दॆनंदिन रोजगार बुडाला जातो तो वेगळाच यामुळे मोठी आर्थिक नुकसान देखील होते ह्या सर्व बाबींचा विचार करता ह्या सर्व आदिवासी बांधवांना वरिल सर्व कोणताही प्रकार न करता हे जातीचे प्रमाणपत्र घर पोहच मिळालेले असून ह्याकामी मा.श्री. खेडकर साहेब, उपविभागिय अधिकारी निफाड, कु.किसवे मॅडम उपविभागिय अधिकारी, सिन्नर, डॉ.मंगरुळे साहेब तहसिलदार सिन्नर, श्री म्हस्के साहेब, नाय्ब तहसिलदार सिन्नर, सेतू कार्यालय प्रमुख व कर्मचारी सिन्नर ह्या सर्वांचे मिळालेले बहुमोल सहकार्य अतिशय मोलाचे असे आहे. ह्या सर्व अधिका-यांची संस्था कृतज्ञता व्यक्त करुन आभार मानत आहे.

आदिवासी विकास विभागाकडील खावटी योजने अंतर्गत अन्नधान्य वाटप

 

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत राज्यातील सर्व आदिवासींना पावसाळ्यातील चार महिने कालावधीसाठी रोजगार अभावी उपासमारीची वेळ येवू नये म्हणून आदिवासी कुटुंबांना चार महिन्यासाठीचे १७० किलो गहु, सात किलो उडीद डाळ, चार किलो तेल, दोन किलो हळद, दोन किलो लाल तिखट मिरची, व रु.१२०२/- रोख रक्कम प्रतिष्ठानच्या खास प्रयत्नाने दि. ३ जुलॆ २००८ रोजी गावामधील एकुण ३५ आदिवासी कुटुंबाना कुंदेवाडी गावात ह्या योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला.
 
दुधाळ योजने अंतर्गत दुग्ध गायींचे वाटप
 
 

माहे फेब्रुवारी २००९ ते मे २००९ सत्यसेवा ग्रामविकास प्रतिष्ठाणच्या अथक प्रयत्नाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडील दुधाळ योजने अंतर्गत कुंदेवाडी येथील आदिवासी बांधवांना दुग्ध व्यवसायासाठी मोफत दुग्ध गायींचे वाटप केले आहे या योजनेत एकुण १०४ लाभार्थींना एकुण १२३ गायींचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी सोबतच्या छाया चित्रामध्ये प्रतिष्ठाणचे अध्यक्ष श्री. नामकर्ण आवारे साहेब व सहकारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे लाभार्थी श्री. दशरथ जाधव, श्रीराम साळुंके, शरद माळी, ज्ञानेश्वर जाधव, रामनाथ पवार त्याच बरोबर प्रतिष्ठाणचे पदाधिकारी श्री. शिवराम माळी, अंजली वैष्णव, विक्रम पोटे, किरण नाठे, संदिप नाठे, शरद पोटे, मंगेश नाठे आदी.

 

आदिवासी कुटुंबास उत्पन्न दाखला मिळवुन देणे -

तसेच महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाकडील सर्व योजनांचा फ़ायदा प्रत्येक आदिवासी कुटुंबाना मिळवुन द्यावयाचा असेल तर प्रत्येक कुटुंबाकडे उत्पन्नाचा दाखला देखील आवश्यक आहे . त्याप्रमाणे कुंदेवाडी गावामधील सर्व १३१ आदिवासी कुटुंबाकडे उत्पन्न दाखला नसल्याने वरील सर्व कुटुंब व कुटुंबातील सद्स्यांना उत्पन्नाचा दाखला मिळवुन देण्याचे काम ह्या संस्थेने हाती घेतले. व संस्थेने स्वत कागदपत्रांची पुर्तता करुन खालील प्रमाणे उत्पन्नाचे दाखले संस्थेच्या प्रयत्नाने मिळवुन दिले.

या कामी देखील शासकीय नियमातील कागदपत्राची सर्व पुर्तता संस्थेने स्वत:करुन कोणाही आदिवासीस तहसिलदार कचेरीत न पाठवता मिळालेले उत्पन्नाचे दाखले कुंदेवाडी येथे संस्था आज समारंभ पुर्वक वाटप करत आहे. ह्याकामी लाभार्थीनां स्वत:स कोठेही जावे लागले नाही अथवा ह्याकामी एक रुपया देखील खर्च करावा लागला नाही. ही गोष्ट संस्था ह्याठिकाणी अभिमान पुर्वक नमुद करत आहोत.

सर्वसाधारणपणे तालुक्यातील कुठ्ल्याही व्यक्त्तीस उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी,त्याची कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी तसेच ते मिळविण्यासाठी शासकीय कार्यालयात चकरा मारने इत्यादी सर्व कामासाठी साधारणपणे चारशे ते पाचशे रुपये इतका खर्च येतो शिवाय किती तरी दिवसाचा
दैनंदिन रोजगार बुडला जातो ती वेगळीच बाब ह्या सर्व बाबीचा विचार करता ह्या सर्व आदिवासी बांधवांना वरिल सर्व कोणताही प्रकार न करता हे जातीचे प्रमानपत्र घर पोहोच मिळालेले असुन ह्याकामी मा.श्री.खेडकर साहेब उपविभागीय अधिकारी निफ़ाड, श्रीमती किसवे मॅडम,उपविभागीय अधिकारी सिन्नर, डॉक्टर मगरुळे साहेब तहसिलदार सिन्नर, श्री म्हस्के साहेब, नायब तहसिलदार सिन्नर, सेतु कार्यालय प्रमुख व कर्मचारी सिन्नर ह्या सर्वांचे मिळालेले बहुमोल सहर्काय अतिशय मोलाचे असे आहे. ह्या सर्व अधिका-र्यांची संस्था कृतज्ञता व्यक्त करत आहे. तसेच ह्या निम्मित्ताने उपरोक्त सर्व अधिक-र्यांना अशी विनंती करण्यात येते की, अद्याप बरीच उत्पन्नाचे दाखले घेणे बाकी आहे उत्पन्न दाखले घेण्यासाठी देखील भविष्यात अशाच सहकार्याची आम्ही कृतज्ञता पुर्वक अपेक्षा करतो.

 

उत्पन्न दाखला वितरण तपशिल
   
तपशिल आकडेवारी
   
कुंदेवाडी गावातील एकुण आदिवासी कुटुंबाची संख्या १३१
प्रत्यक्षात मिळालेले उत्पन्नाचे दाखले (२००७ते २००८) २९
चालु आथि‘क वर्षाचे उत्पन्न दाखले मिळणे बाकी कुटुंब (२००८ते२००९) १३१
अद्याप उत्पन्नाचादाखला घेणे बाकी असलेले कुटुंब १३१
   
ह्यसाठी बचत झालेला अपेक्षित एकुण खर्च -२९ X रु.४००/- = रु. ११,६००/-

 

दारीद्रय रेषेखालील आदिवासी कुटुंबाना मोफत घरगुती गॅस कनेक्शन मिळवुन देणे -

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत राज्यातील सर्व आदिवासी कुटुंबाना मोफत स्वयंपाकाचा घरगुती गॅस देण्याची योजना आज कार्यरत आहे.
परंतु ही योजना राज्यातील बहुसंख्य आदिवासी बांधवापर्यत पोह्चत नाही परिणामी तिचा फायदा साधारण ९० टक्ये कुटुंबाना मिळत नाही. मात्र आमचा ह्या संस्थेने आदिवासी साठी असलेल्या सर्व योजनांचा अभ्यास करुन ही योजना कुंदेवाडी गावातील प्रत्येक आदिवासी कुटुंबापर्यत १०० टक्के परिणाम कारकरित्या पोहचविण्याचा चंग बांधुन ते काम हाती घेऊन पुर्णत्वाच्या दिशेने संस्थेची वाटचाल चालु आहे.

या योजनेचा फायदा प्रत्येक आदिवासी कुटुंबास मिळण्यासाठी करावयाची कागदपत्राची पुर्तता १) विहित नमुन्यात अर्ज २) रहिवाशी दाखला, ३) शाळा सोडल्याचा दाखला, ४) कुटुंबाचा दारिद्रय रेषेखालील नंबर, ५) उत्पन्न दाखला, ७) रेशन कार्डची झेरॉक्स प्रत इ. सर्व कागदपत्रांची देखील पुर्तता संस्थेने केली त्याकामी कोणत्याही व्यक्त्तीस कार्यालयात जावे लागले नाही. त्या मिळालेल्या फायद्याचा तपशिल खालील प्रमाणे-

मोफत घरगुती गॅस कनेक्शन मिळालेल्या व मिळणा-या योजनचा तपशिल.
   
तपशिल आकडेवारी
   
कुंदेवाडी गावातील एकुण आदिवासी कुटुंबाची संख्या १३१
मंजुर झालेले गॅस युनिट ६२
अद्याप मंजुरीसाठी प्रलंबित अर्ज ११०
अद्याप अर्ज करणे बाकी राहिलेले आदिवासी कुटुंब ४८
   
ह्या कामातुन झालेला आर्थिक फायदा - ६२ X रु. ५,०००/- = रु. ३,१०,०००/-



दारिद्र्य रेषेखालील महिलांचे बचतगट स्थापन करुन स्वावलंबी करणे -

प्रतिष्ठाणचे प्रयत्नाने कुंदेवाडी व मुसळगाव मधील दारिद्र्य रेषेखालील कार्ड धारक महिलांचे एकुण ७ महिलाबचत गट केलेले असुन हे सर्व ७ महिला बचत गट जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा, नाशिक यांच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेले आहे. या बचत गटात एकुण ८४ महिला ह्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. त्यांचेसाठी उरलब्ध असलेल्या विविध शास्कीय योजना उपलब्ध करुन देण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.

सर्वसाधारण महिलांचे बचत गट स्थापन करणे -

प्रतिष्ठाणच्या प्रयत्नाने कुंदेवाडी व परिसरातील सर्वसाधारण महिलांचे एकुण ३२ महिलाबचत गट स्थापन केलेले आहे. या सर्व बचत गटात एकुण ४१६ महिला सहभागी झालेल्या आहेत. या सर्व महिलांनी स्वत:चे पायावर आपले व्यवसाय सुरु करावे असे संस्थेचे धोरण असुन त्या कामी लागणारे सर्व सहकार्य देण्यासाठी संस्था तयार आहे.

हवाई सुंदरी व हवाई सेवक १ वर्षाचे प्रशिक्षण -

आदिवासी तरुण तरुणींसाठी हवाई सुंदरी व हवाई सेवक या उच्च प्रशिक्षणासाठी ३ युवक व १ युवती यांची निवड संस्थेच्या माध्यामातुन झाली. या प्रशिक्षण कर्यकाळात त्यांना पुणे येथे रहावयाची, जेवणाची व प्रशिक्षणासाठी येणाया खर्च रुपये २,००,०००/- प्रत्येकी असा असुन एकुण ८,००,०००/- हा प्रशिक्षण कार्यक्रमाचा खर्च संस्थेच्या मध्यामातुन मोफत झाला.
सिन्नर तालुक्यातुन प्रथमत: हवाई प्रशिक्षणासाठी प्रतिष्ठाणच्यावतीने ४ युवक युवतींची निवड झाली.

विडी कामगारांना पिवळी शिधापत्रिका वाटप -

दि. ०९ सप्टेंबर २००८ च्या शासन निर्णयाप्रमाणे विडी कामगारांना तात्पुरती पिवळी शिधा पत्रिका सत्यसेवा ग्रामविकास प्रतिष्ठाणच्या माध्यामातुन कुंदेवाडी गावातील ७९ विडी कामगारांना मिळवुन देण्यात आले आहे. बाकी असलेल्यापैकी २० मंजुरीसाठी तहसिल कार्यालयात दाखल केलेले आहे.

 
 
योजनेचे नांव प्रत्यक्ष लाभ मिळालेले लाभार्थी संख्या फायद्याची रक्कम अद्याप मिळवण्याची लाभार्थी संख्या
       
जात प्रमाणपत्र २२३ ५,५७,५००/- ३३७
गॅसधारक ६२ ३,१०,०००/- ११०
खावटी ३५ १,४७,०००/- ४२
उत्पन्न दाखला २९ ७२,५००/- १३१
गायी १०४ ३७,४४,०००/- ३३
हवाई सुंदरी व हवाई सेवक नियुक्ती ०४ ८,००,०००/- --
       
एकुण ५५९ ५६,३१,०००/- ६५३
       
       
एक वर्षाच्या कालावधीत गावातील आदिवासी बांधवांसाठी विविध योजनेतुन एकुण उलाढाल रुपये - ५६,३१,०००/- इतक्या रक्कमेची होईल.
 
 
 
मॉडेल व्हिलेज संकल्पना