Photo Photo Photo Photo Photo Photo Photo Photo Photo
 
     
  बालवाडी
  कृषि समिती
  स्वयं रोजगार
  आरोग्य समिती
  ग्रामसुधार समिती
  आदिवासी समिती
     
 
 
कृषि समितीचा उद्देश व हाती घेतलेले कामे

     
* समितीचा उद्देश :- खुल्या आर्थव्यवस्थेच्या सामना करण्यासाठी पारंपारीक शेतीऎवजी आधुनिक व्यापरी शेती करुन शेती विकास करणे,कुटुंबाचा परिणामी गावांचा विकास करणे. * समितीने हाती घेतलेली कामे :-

१.गावातील शेतक-यांसाठी करावयाच्या प्रत्येक कार्यक्रमाचे नियोजन मंडळाची कृषी समिती करते.

२.राज्यसरकार व केंद्रसरकरच्या वेळोवेळी जाहीर होणा-या योजनांची माहिती घेऊन ती माहीती बैठकीद्वारे ग्रामस्थांना देणे व त्या योजनांचा जास्तीत जास्त फ़ायदा शेतक-यांना करुन देणे.

३.ॠतुमानानुसार गावांत घेतल्या जाणा-या पिकांची लागवड व निगा राखण्यासाठी मार्गदर्शन व त्यावर येणा-या रोगांसाठी प्रतीबंध करण्याची माहीती शेतक-यांना देण्यासाठी वेळोवेळी चर्चासत्र आयोजित करणे.

४.कुंदेवाडी गावातील चारही दिशांचे जमिनीचे माती परिक्षण करुन जमिनीचा पोत कशा पध्दतीचा आहे,कोणत्या पीकासाठी योग्य आहे याचा निष्कर्ष काढुन ठेवणे व त्याच प्रमाणे शेतक-यांना मर्गदर्शन करणे.

५.वाईनसाठी/द्राक्षबाग लागवडीसाठी प्रोत्साहन देणे त्यासाठी शासनाच्या अनुदान योजनांची माहीती देणे.

६.गाव व गावाच्या परिसरात व्रुक्षारोपन करणे व वृक्षसंवर्धन करणे.

७.राष्टीयकृत बँकाकडुन शेतीसाठी वितरित करावयाचे कर्जाची माहीती शेतक-यांपर्यंत पोहचविणे.

८.गावात मोठ्या प्रमाणात दुग्धव्यावसाय वाढवुन शेतीसाठी जोडधंदा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे.
    अ) शेळीपालन व्यवसाय वाढविणे त्यासाठी मार्गदर्शन व शासकिय योजनांची माहीती देणे.
    ब) गाई,म्हशी पालन व्यावसाय वाढविणे त्यासाठीचे मार्गदर्शन व शासकीय योजनांची माहीती देणे.
 
 
     
राष्ट्रीय बागवानी अनुसंधान एवंम विकास प्रतिष्ठाण, क्षेत्रिय अनुसंधान केन्द्र कुंदेवाडीचे कार्यालयाचे छायाचित्रे.
कुंदेवाडी गावामध्ये केन्द्र सरकारने ३० वर्षापुर्वी सुरु केलेले कांदा बी-बियाणे संशोधन केन्द्र सुरु केलेले आहे. सुधारीत बी-बियाणांचा लाभ तालुक्यातील शेतकरी बंधु घेत आहे.
महाराष्ट्र शासन कृषि विभाग राष्ट्रीय फलोत्पादन अभियाना अंतर्गत आदर्श रोपवाटिका