Photo Photo Photo Photo Photo Photo Photo Photo Photo
 
     
  बालवाडी
  कृषि समिती
  स्वयं रोजगार
  आरोग्य समिती
  ग्रामसुधार समिती
  आदिवासी समिती
     
 
   
  * बालवाडी स्थापनेची पार्श्वभुमी :-
   
 
   
 

आमचे गाव हे सिन्नर शहरापासुन ३ कि.मी अंतरावर आहे. गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. पंचायत समिती अंतर्गत अंगणवाडी आहे. परंतु स्वतंत्र अशी उच्च दर्जाचे शिक्षण दीणारी बालवाडी नसल्याने गावातील लहान मुलांची सन २००५-०६ या वर्षात अतिशय गैरसोय झाली ही बाब काही जागृत पालकांनी मंडळाच्या पदाधीका-यांच्या निदर्शनास आणुन दिली यावर सखोल अभ्यास करुन आज मुलांची होणारी गैरसोय टाळावयाची असेल तर आपल्यालाच गावात स्थनिक ठिकाणीच मंडळाचे माध्यमातुन बालवाडी जुन २००६ पासुन सुरू करण्यात आली आहे.

बालवाडीचे नाव- सत्य सेवा विकास मंडळ संचालित, श्री. जगदंबा माता बालविद्या निकेतन, कुंदेवादी हे आहे.

* बालवाडी स्थापनेचा मुख्य हेतु :-

१. कुंदेवाडीतील साडेतीन ते साडेचार वर्ष वयोगटातील लहान मुलांना गावात शिक्षणाची सर्व सोयींनी युक्त असे आधुनीक शिक्षण मिळवण्यासाठी बालवाडी सुरु करणे.

२. लहान वयात मुलांना शाळेची व शिक्षणाची गोडी निर्माण होऊन उद्याचा चांगला नागरीक घडविण्याचा भक्कम पाया घालणे.

३. लहाण मुलांचा मानसिक,शारीरीक व सामाजिक विकसाचा पाया लहान वयात पक्का करणे.

४. लहान वयात मुलांचे विविध छंदाचे निरिक्षण करणे व त्याबाबत मार्गदर्शन करणे.

कृषि समितीचा उद्देश व हाती घेतलेले कामे

     
* समितीचा उद्देश :- खुल्या आर्थव्यवस्थेच्या सामना करण्यासाठी पारंपारीक शेतीऎवजी आधुनिक व्यापरी शेती करुन शेती विकास करणे,कुटुंबाचा परिणामी गावांचा विकास करणे. * समितीने हाती घेतलेली कामे :-

१.गावातील शेतक-यांसाठी करावयाच्या प्रत्येक कार्यक्रमाचे नियोजन मंडळाची कृषी समिती करते.

२.राज्यसरकार व केंद्रसरकरच्या वेळोवेळी जाहीर होणा-या योजनांची माहिती घेऊन ती माहीती बैठकीद्वारे ग्रामस्थांना देणे व त्या योजनांचा जास्तीत जास्त फ़ायदा शेतक-यांना करुन देणे.

३.ॠतुमानानुसार गावांत घेतल्या जाणा-या पिकांची लागवड व निगा राखण्यासाठी मार्गदर्शन व त्यावर येणा-या रोगांसाठी प्रतीबंध करण्याची माहीती शेतक-यांना देण्यासाठी वेळोवेळी चर्चासत्र आयोजित करणे.

४.कुंदेवाडी गावातील चारही दिशांचे जमिनीचे माती परिक्षण करुन जमिनीचा पोत कशा पध्दतीचा आहे,कोणत्या पीकासाठी योग्य आहे याचा निष्कर्ष काढुन ठेवणे व त्याच प्रमाणे शेतक-यांना मर्गदर्शन करणे.

५.वाईनसाठी/द्राक्षबाग लागवडीसाठी प्रोत्साहन देणे त्यासाठी शासनाच्या अनुदान योजनांची माहीती देणे.

६.गाव व गावाच्या परिसरात व्रुक्षारोपन करणे व वृक्षसंवर्धन करणे.

७.राष्टीयकृत बँकाकडुन शेतीसाठी वितरित करावयाचे कर्जाची माहीती शेतक-यांपर्यंत पोहचविणे.

८.गावात मोठ्या प्रमाणात दुग्धव्यावसाय वाढवुन शेतीसाठी जोडधंदा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे.
    अ) शेळीपालन व्यवसाय वाढविणे त्यासाठी मार्गदर्शन व शासकिय योजनांची माहीती देणे.
    ब) गाई,म्हशी पालन व्यावसाय वाढविणे त्यासाठीचे मार्गदर्शन व शासकीय योजनांची माहीती देणे.

स्वयं रोजगार निर्मान समितीचा उद्देश व हाती घेतलेली कामे

* समितीचा उद्देश- सहजगत्या नोकरी उपलब्ध नसल्याने सुशिक्षित तरुणांनी जास्तीत जास्त व्यवसायाकडे वळण्यासाठी मार्गदर्शन करणे व रोजगार निर्मिती करुन कुटुंबाचा आर्थिक विकास करणे.

* समितीने हाती घेतलेली कामे :-

१.राज्य सरकार व केंद्र सरकरच्या स्वयंरोजगाराविषयक वेळोवेळी जाहीर होणा-या योजनांची माहिती घेऊन ती माहीती बैठकीद्वारे ग्रामस्थांना देणे व त्या योजनांचा जास्तीत जास्त फ़ायदा ग्रामस्थांना करुन देणे.

२.कुंदेवाडी गावातील सुशिक्षित बेरोजगार व्यक्तिंसाठी दरवर्षी स्वयंरोजगार शिबिराचे आयोजन करुन व्यवसाय मार्गदर्शन करणे व गावातील जास्तीत जास्त तरुणांना व्यावसायीक बनवण्यासाठी सर्वप्रकारचे सहकार्य करणे.

३.गावातील महीलांसाठी टेलरींग,भरतकाम,कपड्यावर पेंटींग,ई. रोजगारासंबंधी प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करणे.

४.दुग्धव्यवसाय विकासास प्राधांन्य देण्यासाठी दुध डेअरीची स्थापना करणे.

५.दुग्धव्यवसाय,कुक्कुट पालन,वराह पालन,शहामृग पालन इ.व्यवसायाची माहीती देण्यासाठी चर्चासत्र व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करणे.

६.कमी भांडवलामध्ये घरगुती व्यवसाय सुरु करण्यासाठी पुरुष व महिलांना प्रशिक्षित करुन त्यांचे व्यवसाय उभे करण्यासाठी सर्व ती मदत करणे.


आरोग्य समितीचा उद्देश व हाती घेतलेली कामे :-


* समितीचा उद्देश - कुंदेवाडी गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा विकास करणे व सद्रृढ नागरिक घडविणे.

* समितीने हती घेतलेली कामे :-

१) राज्य असरकार व केंद्र सरकरच्या आरोग्य विषयक वेळोवेळी जाहीर होणा-या योजनांची माहिती घेऊन ती माहीती बैठकीद्वारे ग्रामस्थांना देणे व त्या योजनांचा जास्तीत जास्त फ़ायदा ग्रामस्थांना करुन देणे.

२) गावातील आरोग्यविषयक विकासासाठी वेगवेगळ्या शिबिरांचे व चर्चा सत्रांचे आयोजन करणे.

    अ) समाजातील घटकांना मदतीच्या भावनेने रक्तदान शिबिर घेऊण रक्तदान करणे.
    ब) तज्ञ डॅक्टरांचे हजेरीत सर्व रोगनिदान शिबिरांचे अयोजन करणे.
    क) गावातील प्रत्येक व्यक्तीचा रक्तगट तपासुन देणे व त्यांची यादी मंडळाकडे ठेवणे.
    ड) मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन व नियोजन करणे.


३) गावात येणा-या साथीच्या रोगांवर कायम स्वरुपी उपाय योजना करणे.

४) शासकिय पल्स पोलिओ मोहीम राबविण्यासाठी सक्रिय सह्भाग घेणे.

५) आपले घर आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ग्रामस्थांना मार्गदर्शन व प्रबोधन करणे.

६) गरिबांना औषधोपचार व वैद्यकिय उपचारासाठी सर्व प्रकारची मदत करणे.

७) गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सोयी सुविधा व कामकाजावर लक्ष देणे.

८) श्र्वानदंश व सर्पदंशावरील लस ह्या महत्वाच्या लसी आपल्या आरोग्य केंद्राकडे उपलब्ध आहे का? या कडे सातत्याने लक्ष देणे..




ग्रामसुधार समितीचा उद्देश व हाती घेतलेली कामे:-


* समितीचा उद्देश :- कुंदेवाडी गावाचा सर्वांगीन विकास करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेबरोबर काम करणे.व संस्थेकडुन गावासाठी आवश्यक विकास करुन घेणे.

* समितीने हाती घेतलेली कामे:-

१) राज्य सरकार व केंद्र सरकरच्या ग्रामविकास खात्याकडुन वेळोवेळी जाहीर होणा-या योजनांची माहिती घेऊन ती माहीती बैठकीद्वारे ग्रामस्थांना देणे व त्या योजनांचा जास्तीत जास्त फ़ायदा ग्रामस्थांना करुन देणे.

२) कुंदेवाडी ग्रामपंचायतीच्या ग्राम सभेत सक्रीय सहभाग घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासाची कामे सुचविले व ती करुन घेणे.

३) ग्रामपंचायतीचे कर्त्यव्य व जबाबदर-या या बाबतचे महत्व ग्रामस्थांना समजाऊन सांगणे.

४) गावातील आरोग्य विषयक समस्या, पाणी उपलब्धतेच्या समस्या, अंतर्गत रस्ते दुरुस्ती, स्ट्रीट लाईट,गटारी,ईदिरा निवास अंतर्गत घरकुल ई.बाबत ग्रामसभॆत सहभाग घेऊन गावाच्या सर्वांगीन विकासासाठी ही कामे शासकिय यंत्रणेकडुन करुन घेणे.

५) महिलांकरीता सार्वजनिक शौचालयाची निर्मिती ग्राम पंचायतीकडुन करुन घेणे.

६) प्रत्येक घराचा परिसर व गल्ली स्वच्छ राहील यासाठी ग्रामस्थामध्ये प्रबोधन करणे.




आदिवासी विकास व उत्कर्ष समितीने हाती घेतलेली कामे :-

सत्य सेवा ग्रामविकास प्रतिष्ठान ही (एन.जी.ओ) आदर्श ग्राम संकल्पनेचा ध्यास घेवून सामाजिक कार्यात उतरलेली आहे. परंतु आदर्श ग्रामसंकल्पना साकार करायची असेल तर गावातील प्रत्येक नागरिकाचे राहणीमान स्तर उंचावला पाहिजे, प्रत्येक घटकाचा विकास झाला पाहिजे ह्या बाबीचा विचार करुन प्रतिष्ठानने प्रथम पुर्ण गावाचे सुक्ष्म निरिक्षण (सर्वे) करुन प्राथमिक सुविधापासून देखील वंचीत असलेल्या गावातील आदिवासी बांधवाकडे लक्ष केंद्रीत केले. त्याचे राहणीमान उंचावण्यासाठी प्रतिष्ठानने गावातील आदिवासींचा विकास व त्यांचा उत्कर्ष हा ठोस कार्यक्रम हाती घेतला त्याप्रमाणे गावातील आदिवासी कुटुंबाचा सर्व्हे करुन एकुण ७६ कुटुंबातील ४५४ आदिवासींचा त्यांचे शिक्षण, वय,व्यवसाय व घराची एकदंर परिस्थिती यांचे पुर्ण सर्वेक्षण करुन त्याची एकत्रीत माहिती गोळा केली असता त्यातून एक बाब प्रकर्शाने लक्षात आली की, गावातील सर्व आदिवासी बांधव हे आज प्रचलित शासकीय योजनांपासून १००% दुर्लक्षित आहे. ह्या योजनांच्या माहिती बद्दल त्यांना गंध देखिल नाही ह्या आदिवासींचा विकास करावयाचा असेल तर त्यांना शासनाच्या विविध योजना त्यांच्या घरापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. त्याकामी प्रथम या संस्थेने असलेल्या सर्व योजनांचा अभ्यास केला असता असे लक्षात आले की, महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाकडे महाराष्ट्रातील सर्व आदिवासी बांधवांसाठी एकुण ३५ प्रकारच्या विविध योजना कार्यरत आहे. त्या सर्व योजनांचा फायदा द्यावयाचा असल्यास प्रत्येक आदिवासी कुटुंबाकडे जातीचा दाखला व उत्पन्नाचा दाखला असल्याशिवाय ह्या एकाही योजनेचा फायदा त्यांना मिळणार नाही. म्हणून आम्ही प्रत्येक आदिवासी व्यक्तीकडे जातिचा दाखला व उत्पन्नाच्या दाखल्याची चॊकशी केली असला त्यांच्याकडे हे दाखले नाही, ते कोठे मिळतात याची माहिती नाही अथवा ते काढण्यासाठी काय कागद पत्र लागतात त्या कागदपत्राची एकाही आदिवासी बांधवाकडे उपलब्धता नसल्याने आमच्या संस्थेने प्रथम कुंदेवाडी गावातील सर्व १००% कुटुंबांना जातीचा दाखला व उत्पन्नाचा दाखला मिळवुन देण्याचा ठोस कार्यक्रम हाती घेण्याचे निश्चित केले व प्रत्यक्ष कामाला लागलो.

१) आदिवासी कुटुंबास जात प्रमाणपत्र मिळवुन देण्यासाठी प्रतिष्ठाणचे प्रयत्न :-


कुंदेवाडी गावामधील सर्व आदिवासी बांधवाचा प्रतिष्ठानने सर्व्हे केला असता प्रथम फक्त एकाच कुटुंबातील ८ व्यक्तीकडे जात प्रमाणपत्र असल्याचे आढळुन आले. बाकी ७४ कुटुंब व त्या कुटुंबातील ४४६ सदस्यांकडे जात प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याने प्रतिष्ठानने कुंदेवाडी गावातील सर्व आदिवासी बांधवाना जात प्रमाणपत्र मिळवुन देण्यासाठी व जात प्रमाणपत्राचे असलेले महत्व पटवून देण्यासाठी दि.२१/१२/२००७ रोजी कुंदेवाडी गावात जात प्रमाणपत्र माहिती मेळावा घेण्यात आला. शासकीय नियमातील कागदपत्रांची सर्व पुर्तता संस्थेने स्वत: करुन कोणाही आदिवासीस तहसिलदार कचेरीत न पाठवता सर्व काम संस्थेने पुर्ण केले व दाखले मिळविले ते दाखले कुंदेवाडी येथे संस्थेने दि.२६/०२/२००९ रोजी समारंभ पुर्वक वाटप केले. ह्याकामी लाभार्थींना स्वता:स कोठेही जावे लागले नाही अथवा ह्याकामी एक रुपया देखील खर्च करावा लागला नाही. ही गोष्ट संस्था ह्याठिकाणी अभिमान पुर्वक नमुद करत आहे. सर्वसाधारणपणे तालुक्यातील कुठल्याही व्यक्तीस जात प्रमाणपत्र घेण्यासाठी, त्याची कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी तसेच ते मिळविण्यासाठी शासकीय कार्यालयात चकरा मारणे इत्यादी सर्व कामासाठी साधारणपणे दोन ते तीन हजार रुपये इतका खर्च येतो शिवाय किती तरी दिवसाचा दॆनंदिन रोजगार बुडाला जातो तो वेगळाच यामुळे मोठी आर्थिक नुकसान देखील होते ह्या सर्व बाबींचा विचार करता ह्या सर्व आदिवासी बांधवांना वरिल सर्व कोणताही प्रकार न करता हे जातीचे प्रमाणपत्र घर पोहच मिळालेले असून ह्याकामी मा.श्री. खेडकर साहेब, उपविभागिय अधिकारी निफाड, कु.किसवे मॅडम उपविभागिय अधिकारी, सिन्नर, डॉ.मंगरुळे साहेब तहसिलदार सिन्नर, श्री म्हस्के साहेब, नाय्ब तहसिलदार सिन्नर, सेतू कार्यालय प्रमुख व कर्मचारी सिन्नर ह्या सर्वांचे मिळालेले बहुमोल सहकार्य अतिशय मोलाचे असे आहे. ह्या सर्व अधिका-यांची संस्था कृतज्ञता व्यक्त करुन आभार मानत आहे.

आदिवासी विकास विभागाकडील खावटी योजने अंतर्गत अन्नधान्य वाटप

 


एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत राज्यातील सर्व आदिवासींना पावसाळ्यातील चार महिने कालावधीसाठी रोजगार अभावी उपासमारीची वेळ येवू नये म्हणून आदिवासी कुटुंबांना चार महिन्यासाठीचे १७० किलो गहु, सात किलो उडीद डाळ, चार किलो तेल, दोन किलो हळद, दोन किलो लाल तिखट मिरची, व रु.१२०२/- रोख रक्कम प्रतिष्ठानच्या खास प्रयत्नाने दि. ३ जुलॆ २००८ रोजी गावामधील एकुण ३५ आदिवासी कुटुंबाना कुंदेवाडी गावात ह्या योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला.

 
 
       
अ.नं मिळेलेले प्रकल्प मिळेलेले प्रलंबित अर्ज कामाची रक्कम
       
१) कुंदेवाडी गावातील एकुण आदिवासी कुटुंबाची संख्या ७६  
२) ७६ कुटुंबातील सदस्यांची संख्या ४५४  
३) जातीचे दाखले मिळालेले लाभार्थिंची संख्या ५५०  
४) उत्पन्नाचे दाखले मिळालेले लाभार्थि संख्या ५५०  
५) मोफत गॅस कनेक्शन योजनेचा फायदा    
६) जुलॆ महिन्यातील खावटी योजनेचा फायदा ३५  
७) दुधाळ योजने अंतर्गत संकरीत गायी ०४ ७२