Photo Photo Photo Photo Photo Photo Photo Photo Photo
 
     
  बालवाडी
  कृषि समिती
  स्वयं रोजगार
  आरोग्य समिती
  ग्रामसुधार समिती
  आदिवासी समिती
     
 
 
* बालवाडी स्थापनेची पार्श्वभुमी :-
 
बालवाडीचा उदघाटन समारंभ बालवाडीचा उदघाटन समारंभ बालवाडीचा राष्ट्रीय ध्वजारोहन कार्यक्रम
     
 
बालवाडीची इमारत बाल विद्यार्थ्यानां गणवेश वाटप करतांनाचे क्षणचित्रे  
 

आमचे गाव हे सिन्नर शहरापासुन ३ कि.मी अंतरावर आहे. गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. पंचायत समिती अंतर्गत अंगणवाडी आहे. परंतु स्वतंत्र अशी उच्च दर्जाचे शिक्षण दीणारी बालवाडी नसल्याने गावातील लहान मुलांची सन २००५-०६ या वर्षात अतिशय गैरसोय झाली ही बाब काही जागृत पालकांनी मंडळाच्या पदाधीका-यांच्या निदर्शनास आणुन दिली यावर सखोल अभ्यास करुन आज मुलांची होणारी गैरसोय टाळावयाची असेल तर आपल्यालाच गावात स्थनिक ठिकाणीच मंडळाचे माध्यमातुन बालवाडी जुन २००६ पासुन सुरू करण्यात आली आहे.

बालवाडीचे नाव- सत्य सेवा विकास मंडळ संचालित, श्री. जगदंबा माता बालविद्या निकेतन, कुंदेवादी हे आहे.

* बालवाडी स्थापनेचा मुख्य हेतु :-

१. कुंदेवाडीतील साडेतीन ते साडेचार वर्ष वयोगटातील लहान मुलांना गावात शिक्षणाची सर्व सोयींनी युक्त असे आधुनीक शिक्षण मिळवण्यासाठी बालवाडी सुरु करणे.

२. लहान वयात मुलांना शाळेची व शिक्षणाची गोडी निर्माण होऊन उद्याचा चांगला नागरीक घडविण्याचा भक्कम पाया घालणे.

३. लहाण मुलांचा मानसिक,शारीरीक व सामाजिक विकसाचा पाया लहान वयात पक्का करणे.

४. लहान वयात मुलांचे विविध छंदाचे निरिक्षण करणे व त्याबाबत मार्गदर्शन करणे.